Thursday, August 25, 2011

प्रेम करायला अजुन जमलेच नाही



कितीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तिची स्तुती करुन तिला
हरभराच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शिट्ट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही..

दुसरयाचे विचार ऎकत असताना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही..

कधी हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुष्टिकोनानी कधी बघितलेच नाही
या व्यतिरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायला मिळालेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही..

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाला कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही..

फुलपाखराप्रमाणे आम्ही ही
बरयाच सुंदर फुलांमधे वावरत होतोपण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही......

Wednesday, May 4, 2011

वेळ थोडाच आहे रे माझ्याकडे


वेळ थोडाच आहे रे माझ्याकडे

करायचं अजुन खूप काही बाकी आहे....

आपल्याच माणसांनी दिलेल्या

जखमा भरायचं अजुन बाकी आहे...

तुझ्या प्रेमाची सवय झाली होती मला!

म्हणुनच तुला विसरायचा प्रयत्न अजुन बाकी आहे....

तुझ्या अमुल्य वेळेतला थोडा अजुन वेळ देशिल का मला?

अजुनही प्रेमाचं तुझ एक कर्तव्य अजुन बाकी आहे....

मला स्मशानापर्यंत सोडुनच परतु नकोस

माझ्या काळजात तुझ्याबद्दलच्या भावना अजुन बाकी आहेत......

जाताना त्या तुझ्यासंगे घेउन जा...

कारण माझ्या देहाच जळणं अजुन बाकी आहे.....

मला जाळताना रडु नकोस वेडी

नाही तर त्या यमालाही सांगाव लागेल

" जरा थांबतोस का ? माझं तिला समजावणं अजुन बाकी आहे......"